ऊसतोड कामगारांचे बाजरी खारवडी उद्योगोतुन सक्षमीकरण

  • Post author:
  • Post category:KVK
  • Post comments:0 Comments

ऊसतोड कामगारांचे बाजरी खारवडी उद्योगोतुन सक्षमीकरण

भारतातील अग्रगण्य साखर उत्पादक राज्यांपैकी महाराष्ट्र एक आहे. दरवर्षी महाराष्ट्राच्या दुष्काळग्रस्त भागांमधुन लाखोंच्या संख्येने मराठवाडाविदर्भखानदेश तसेच इतर भागांमधून ऊसतोड कामगार ऊसतोडीसाठी स्थलांतरीत होतात. महाराष्ट्रातुन कोरडवाहू शेती असणारा वर्गकामगारभुमीहीन शेतमजुरभटके तसेच आदिवासी ऊसतोडीसाठी जाण्यास प्राधान्य देतात. ऊसतोड कामगाराला वर्षभर गावामध्ये रोजगार उपलब्ध नसतो. सिमांत जमिन धारणाहलकी व अल्प उत्पादक शेत जमिन तसेच अपुऱ्या सिंचन सुविधा यावरोवर ऊस तोडीतुन मिळणारी एक हाती रक्कम यामुळे शेतकरी ऊस तोडीला जाण्यास प्राधान्य देतात. ऊसतोड कामगार हे सहा महिन्यांसाठी स्थलांतरित होतात. कामगारांना अंदाजे १२ ते १४ तास काम करावे लागत असल्यामुळे हे अतिशय कष्टदायी काम आहे. सोवतच त्यांना अनेक अडचणीना तोंड दयावे लागते. ऊस तोडीच्या ठिकाणी जगण्यासाठी लागणाऱ्या सर्व साधारण सोयी-सुविधा उलपब्ध होत नाहीत. महिलाचे आजारपणमासिक पाळीगरोदरपणात ही ऊसतोडीचे काम करावे लागते. त्यामुळे त्यांच्या आरोग्यावर विपरीत परीणाम होतो. स्थलांतरणामुळे मुलांचे शैक्षणिक स्थैर्य व गुणवत्ता या दोन्ही गोष्टीवर परीणाम होतो. मुलीचे वाल विवाह केले जातात.

 अशा अनेक अडचणीना ऊसतोड कामगारांना तोंड द्यावे लागते. तरीही आजपर्यत ऊस तोड कामगार हा दुर्लक्षित घटक राहिला आहे तसचे या अपेक्षित वंचित गटाला कोणत्याही कायद्याचं संरक्षण नाही. कामगारांच्या हाताला गावातच वर्षभर काम मिळावे जेणेकरून कामगारांना या अडचणींना तोंड द्यावे लागणार नाही. या दृष्टिकोनातून दीनदयाल शोध संस्थान कृषी विज्ञान केंद्र आंबेजोगाई मार्फत ऊसतोड कामगांरासाठी कार्य सुरू केले आहे. या मजुरांना ऊसतोडी इतकीच रक्कम गावात राहुन मिळावी यासाठी प्रयत्न चालू आहेत. वेगवेगळ्या गावात व तांडयावर ऊसतोड कामगारांच्या वैठका घेतल्यासंस्थेचे प्रकल्प प्रमुख व केंद्राचे शास्त्रज्ञ यांनी पहिली वैठक शिवाचा तांडा येथे घेतली. या बैठकीतून त्यांची ऊसतोडीला जाण्याची कारणेअडवणी व इच्छा जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यानंतर कृषि विज्ञान केंद्राच्या माध्यमातुन विविध गावात व तांडावर ऊसतोड कामगारांच्या गटचर्चा व बैठका घेण्यात आल्या. यातून असे निदर्शनास आले कीऊसतोड कामगारांना गावातच काम मिळाले तर ते ऊसतोडीसाठी जाणार नाहीत. या कामगारांमध्ये जागरुकता निर्माण करण्यासाठी ऊसतोड मजुरांसाठी दोन दिवसीय मेळावा हा कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे घेण्यात आला होता. त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून कृषि पुरक व्यवसायाच्या अनुशंगाने व्याख्याने ठेवण्यात आली. ज्या कामगारांनी गावातच व्यवसाय सुरु करून ऊस तोडीला जाण्याचे थांबविले अश्या व्यक्तीनी आपले अनुभव या कार्यक्रमात कथन केले. यावेळी ऊसतोड कामगारांनी ही त्यांना येणाऱ्या समस्यां व आपल्या कडे असलेले कौशल्य यावावत विस्तृत चर्चा केली. याचाच एक भाग म्हणून केंद्राच्या शास्त्रज्ञांनी ऊसतोडीस जाणाऱ्या कामगारांची माहिती संकलन करण्यासाठी फार्म भरुन घेतले. ऊसतोड कामगारांच्या सोवत जवळीकता साधण्यासाठी व आरोग्यावावत जनजागृती करण्यासाठी परसवाग लागवड व पोषण माह यासारखे कार्यक्रम तांडावर घेण्यात आले. या सर्व कार्यक्रमामुळे काही महिलांचे मत परीवर्तन झाले आहे व त्यांनी गावातच वर्षभर रोजगार मिळत असेल तर ऊसतोडीस जाणार नसल्याचे मत मांडले. गावात राहून आम्ही कोणता व्यवसाय करावाप्रक्रिया उद्योग केला तर त्याचे तांत्रिक माहिती आम्हाला मिळेल कातयार केलेल्या मालाला वाजारपेठ मिळेल कात्यातून योग्य तो मोवदला मिळेल काव्यवसायासाठी लागणारे भांडवल कसे उभे करावेअसे अनेक प्रश्न त्यांनी उपस्थित केले. या प्रश्नांचे समाधान करण्यासाठी व त्यांची मानसिकता बदलण्यासाठी त्यांचा एक अभ्यास दौरा कृषी विज्ञान केंद्र आंबेजोगाई येथे आयोजित करण्यात आला. यामध्ये त्यांना वेगवेगळ्‌या व्यवसायांची ओळख व माहिती देण्यात आली. यशस्वी शेतकऱ्यांच्या यशोगाथा दाखवण्यात आल्या. या दौऱ्यानंतर सात महिलांनी पुढाकार घेवून वाजरी खारवडी तयार करण्याचा निर्धार केला आहे. सात महिलांचा एक गट तयार करून वाजरी खारवडी वनवण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. प्रशिक्षणानंतर गटातील एका महिलेने कौटुंबिक अडचणीमुळे लातूरला जाऊन मजुरी करण्यास प्राधान्य दिले. यानंतर कच्च्या गालाती उपलब्धता करणेबाजारातील कामे करण्यासाठी सहा महिलांन सोबतच दोन पुरुषांचा ही समावेश करण्यात आला आहे. महिलांनी इथेच न थांवता कृषि विज्ञान केंद्राच्या गृह विज्ञान विभागाच्या तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या खारवडी वनविण्याचे प्रयोग केले. प्रयोग करत असताना त्याच्या लक्षात आले की वाजरी खारवडी वाळवण्यासाठी जारत उष्णतेची आवश्यकता आहे. त्यामुळे पावसाळ्या किंवा हिवाळ्यात खारवडी वाळवण्यासाठी वाळवणी (ड्रायर) यंत्राची आवश्यकता आहे. बाजारातून ड्रायर खरेदी करण्यास लागणारा खर्च हा जवळपास रु. ५०,०००/- इतका आहे.

हा खर्च जास्त असल्यामुळे या आर्थिक अडचणीवर मात करण्यासाठी फॅब्रिकेटरच्या मदतीने कमी खर्चाचे वाळवणी यंत्र तयार करण्याचा प्रयोग ही करण्यात येत आहे. फॅब्रिकेटरने कमी खर्चात वाळवणी यंत्र बनविण्याची तयारी दर्शवली आहे. सहभागी सहा महिलांचे कार्य पाहून इतर तीन महिलांनी खारवडी करण्याची इच्छा दर्शवली आहे. त्यांनी आपला स्वतंत्र गट तयार केला आहे. याच धरतीवर आणखी दोन गट तयार होत आहेत. ऊसतोडीचे काम संपल्यानंतर काही कुटुंव मार्च महिन्यात गावात परत येतातत्यामुळे या कार्याला मार्चनंतर गती येईल. या महिलांचे कार्य पाहून परत आलेल्या महिलांनाही प्रोत्साहन मिळेल व गटांची संख्या वाढेल. खारवडी व्यतिरिक्त कापुस वाती तयार करणेआवळा कॅण्डी तयार करणेकुक्कुटपालन व शेळीपालन असेही अल्प खर्चीक पर्याय त्यांच्या समोर ठेवण्यात आले आहेत. त्याचबरोबर याच गावात शेतकरी महिलांचा एक गट शेवगा पावडर तयार करण्याचा व्यवसाय करत आहेत. ऊसतोड महिलांनाही या व्यवसायवद्दल माहिती दिली आहे. अशा विविध व्यवसायावावत माहिती महिलांना देण्यात आली आहे. जेणेकरुन वर्षभर त्यांच्या हाताला काम राहून अर्थाजन होईल.

Leave a Reply