दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र अंबाजोगाई येथे महिला शेतकऱ्यांसाठी ‘पोषणमूल्य आधारित परसबाग’ प्रशिक्षण प्रात्यक्षिक व आरोग्य शिबिर संपन्न झाले. कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर डॉ. उपेंद्र कुलकर्णी (प्रकल्प संचालक, दीनदयाल शोध संस्थान बीड), डॉ. नितीन धर्मराव (सदस्य दीनदयाल शोध संस्थान), श्रीमती संध्या कुलकर्णी (संभाजीनगर), श्री. धनराज पवार (आरोग्य समुपदेशक अंबाजोगाई), डॉ. वसंत देशमुख (वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख), श्री. सुहास कुलकर्णी (जिल्हा कार्यक्रम अधिकारी), श्री. अनिल चव्हाण (टेलीमानस, लोखंडी सावरगाव) व रोहिणी भरड यांची उपस्थिती होती.
या कार्यक्रमात अंबाजोगाई, केज, वडवणी आणि धारूर तालुक्यातून १४८ महिला शेतकऱ्यांनी हजेरी लावली होती. प्रशिक्षणार्थींना १६ प्रकारच्या भाज्यांच्या बियाण्यांचे वाटप केले व लागवड साहित्य देण्यात आले. तसेच कार्यक्रमाला उपस्थित सर्व महिला शेतकऱ्यांचे आरोग्य तपासणी करण्यात येवून त्याना औषध-उपचार देण्यात आला. आरोग्य तपासणीसाठी शासनाच्या महालॅब यंत्रणेचे सहकार्य लाभले.
1 / 7
Dr. Upendra Kulkarni guiding farm women
2 / 7
Kitchen garden Kit distribution
2 / 7
Health Check-up
3 / 7
Recording basic health related infromation
4 / 7
Kitchen Garden kit distribution